Maharashtra: 5 स्टार रेटींगवालीच उपकरणे खरेदी करा, MSEB चं ग्राहकांना असंही आवाहन

0
123
3317 वीज वाहिन्यांच्या गाळ्यातील वीज तारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटल्या  283  वीज वाहिन्या गाळ्यातील सैल वीजतारा ओढल्या  261  वीजवाहिन्यांच्या गाळ्यांना गार्डींग बसविले     6  किमी अंतराच्या जीर्ण वीजतारा बदलल्या   106 वाकलेले वा गंजलेले वीज खांब बदलले 1195 पीव्हीसी स्पेसर्स लघुदाब वीज वाहिनीत बसविले  212  ठिकाणी जंपर बदलले   74 पिन, 57 डिस्क व 57 स्टे इन्सुलेटर बदलले   69  खराब रोहित्र पेट्या बदलल्या   महावितरणकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपुर्व विद्युत यंत्रणा देखभाल दुरुस्तीची कामे
महावितरणकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपुर्व विद्युत यंत्रणा देखभाल दुरुस्तीची कामे

मुबंईदेशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत असून गेल्या ४ दिवसांपासून सगळीकडे झगमगाट आहे. पणतीच्या दिव्यांनी उजळणारं अंगण आता इलेक्ट्रीक्सच्या लायटींगने उजळून निघत आहे.
सगळीकडे इलेक्ट्रीक आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा वापर वाढला आहे. त्यामुळे, साहजिकच घरातील लाईट बिलावरही त्याचा परिणाम होत असून वीज वितरण कंपन्यांचाही लोड वाढत आहेत. त्यातूनच अनेकदा लोड शेडींगसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. कदाचित त्यामुळेच, महाविरण विभागाने ग्राहकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे.माणसाला प्रत्येक वस्तू सहज आणि एका क्लिकवर, एका बटणावर सुरू झालेली हवी आहे. त्यामुळेच, पंखा, एसी, मिक्सर, टीव्ही, मोबाईल, इंटरनेट, गाडी, वॉशिंग मशिन्स, बॅटरी, फ्रीज, ओव्हन सगळं काही इलेक्ट्रॉनिक्सवर आधारीत आहे. या सर्व उपकरणांसाठी गरज असते ती लाईट म्हणजेच वीजेची. अगदी सकाळच्या पाणी तापवण्याच्या हीटरपासून ते गुडनाईट म्हणणाऱ्या लिक्वीडपर्यंत सर्वकाही उपकरणे वीजेवरच चालतात. या उपकरणांच्या वापरामुळे आपल्या घरातील लाईटचे बीलही जास्त येत. तर, कंपन्यांवरही वीजेचा अतिरीक्त भार पडतो.

त्यामुळेच, कोरोना कालावधीत लाईट बिलावरुन मोठी समस्या निर्माण झाली होती. कोरोना कालवधी अनेकांच्या घरातील लाईटचं बील वाढीव आल्याने महावितरणविरोधात अनेकांनी मोर्चे काढले होते. तर, काहींनी महावितरणच्या कार्यालयांना टाळेही ठोकले होते. त्यामुळेच, वीजेची बचत हाच बिल कमी येण्याचा पर्यायी मार्ग आहे. त्याला अनुसरुनच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने ग्राहकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. ‘‘स्टार जितके जास्त तितकी त्या विद्युत उत्पादनाची “ऊर्जा बचत क्षमता” जास्त असते. म्हणूनच केव्हाही 5 स्टार रेटिंग असलेलेच विद्युत उत्पादन खरेदी करा”, असे आवाहन एमएसईबीने केले आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सततच्या-बदलत्या-वातावर/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here